भीषण अपघात….ट्रॅक व कार च्या धडकेत एकाच जागीच मृत्यू

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5 एप्रिल) :- घुग्घूस कडून ताडाली कडे कोळसा घेऊन जाणारा ट्रॅक क्रमांक MH 34 /BG 9972 व ताडाली कडून घुग्घूस कडे येणारी कार क्रमांक MH 34 /AA 3053 या दोन्ही वाहनाचा घुग्घूस ताडाली मार्गावरील भाटिया कोल वॉशरीज जवळ आज सकाळी 10.15 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. अपघात एवढा मोठा होता की संपूर्ण कार चकनाचुर होऊन कार चालक प्रविण गिलबिले अंदाजे वय (28) वर्ष रा. चंद्रपूर हा जागीच ठार झाला.

या अपघाताची पोलिसांना होताच घुग्घूस पोलीस स्टेशन चे पोलीस व पडोली पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु सदरील अपघात स्थळ घुग्घूस पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे घटनेचा तपास घुग्घूस पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.