✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि .24 मे) :- भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस व यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे महाकारुणीक तथागत भगवान बुद्ध यांची 2586 वी जयंती साजरी करण्यात आली.
भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मनोहर गाताडे, निरंजन डंभारे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, जिल्हाध्यक्षा मंदाकिनी दुधे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, करुन सामुहिक पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष भा. बौ. महा घुग्घुस प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आयुनी. मंदाकिनी विजय दुधे भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा मायाताई सांड्रावार केंद्रीय शिक्षिका कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, कोषाध्यक्षा वैशालीताई निखाडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर संभाजी पाटील दिगांबर बुरड बापुराव कांबळे जनार्दन जिवने, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शांततेत पार पडला.
या जयंती दिना निमित्त विशेष मार्गदर्शक मंदाकिनी दुधे मॅडम व सुरेश मल्हारी पाईकराव याचे लाभले तसेच मायाताई सांड्रावार, हेमंत आनंदराव पाझारे, रिताताई देशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाला समता सैनिक दल इशा भगत, रिया कांबळे, उन्नती भगत, नकुल पाईकराव, मयुर देशकर, अमर भगत, जान्हवी भगत, आयुषी निखाडे, भारती पाझारे , संभोधी पाटील, आयुष घागरगुंडे, स्मिता गोंगले समता सैनिक दलाचा सर्व सैनिक यांनी धम्म ध्वजारोहण करण्या करीत भव्य रॅली काढुन धम्म ध्वजाला मानवंदना दिली.
यानंतर सर्व सैनिकानी आप आपली कला बाजी, लाठी काठी दाखवुन तथागत बुध्द आला मानवंदना दिली
यशोधरा महिला मंडळा तर्फे भव्य खिर दानाचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे उपाध्यक्ष, शरद पाईकराव, यशोधरा महिला मंडळ चा देखरेख मध्ये घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजना रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली निखाडे यांनी केले.
या बुध्द जयंतीचे औचित्य साधून कांबळे परिवारानी आपल्या आई वडीलांचा स्मुर्तीदिना प्रीत्यर्थ पाच हजार रुपये दान दिले यावेळेस प्रविण कांबळे, वैशाली कांबळे व संपूर्ण कांबळे परिवार उपस्थित होता.
तसेच नथ्थुजी मल्हारी पाईकराव सुजाता नथ्थुजी पाईकराव यांनी नांदेड वरुन येऊन घुग्घुस येथील नवनिर्माण बौद्ध विहार बांधकामास आपल्या नातु यांच्या वाढदिवस साजरा नकरता पाच हजार रुपये दान दिले यावेळेस संपूर्ण पाईकराव परिवार उपस्थित होता.
सायंकाळी भव्य भोजनदान जय भीम युवा मंच तर्फे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळेस समस्त घुग्घुस परीसरातील बौद्ध बांधव उपस्थित होते.