भारतीय कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा वर्षभर धन्या सोबत राबणाऱ्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करनारा हा सण कासार बेहळ येथे साजरा करण्यात आला

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव(दि.14 सप्टेंबर) :- कृषी परंपरेचा वारसा, कृषिप्रधान देश ही ओळख अबाधित ठेवण्यात शेतकरी बांधवांसोबत काळ्या मातीत राबणाऱ्या बैलांचा ही मोलाचा वाटा आहे. या सर्जा-राजा अर्थात बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस.

लाखांचा पोशिंदा शेतकरी बैलांना आपलं कुटुंब सदस्य मानतो, त्यांची काळजी घेतो परंतु यावर्षी शेतकरी राजांचा पोळा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला भविष्यात बळीराजावरील सर्व संकटांचे निवारण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.