भामडेळी येथील बालगोपालांनी वृक्षारोपण करीत साधताय पर्यावरणाचा समतोल

🔹भामडेळी येथे भद्रावती युवासेना अधिकारी राहुल मालेकर यांचे नेतृत्वात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.13 जून) :- 

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख, यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना सचिव वरून सरदेसाई, उपनेत्या शितल देवरुखकर सेठ, कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर युवासेना संपर्क प्रमुख सूर्या हिरेकण तसेच 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर तसेच भामडेळी शाखा प्रमुख विकास घरात यांच्या नेतृत्वात बालगोलांनी आपल्याच गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवीला. 

13 जुन हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस. महत्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री म्हणून कार्य सुध्दा केले आहे. याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखने फार गरजेचे असुन नविन पिढीला एक संदेश देण्याचे दुष्टी कोनातुन भद्रावती तालुका युवासेना अधिकारी तसेच भामडेळी शाखा प्रमुख विकास घरत यांच्या संकल्पनेतुन डिंपल घरत, दामिनी घरत, साक्षी घरत, सुमित घरत, स्वेजल दाभेकर, यामीनी घरत यांनी स्वगावी वृक्षारोपन वृक्षारोपन करुन आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पर्यावरण वाचविण्याचा एक संदेश सुध्दा जनतेमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला.

 आज बालगोपालांच्या माध्यमातुन वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम राबविण्यात आल्यामुळे भामडेळी गावकरी यांनी बालगोपालांचे कौतुक केले.