भाग्यावंता घरी भजन -पुजन त्याची वाट पाहे रघुनंदन…..तहसिलदार ऋषिकेश शेळके

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.20 जानेवारी) :- संतरुपी (बाबांना ) ज्ञानदेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना राज्यातील आदिवासी एकवटला… 

संतरुपी बाबांना श्रद्धांजली वाहताना राज्यातील आदिवासी व महाराष्ट्र राज्यातील आय. ए .एस.आणि आय.पी.एस. एकवटले आज संतरुपी बाबा ज्ञानदेव यांच्या तेराव्याला ह .ब. प. आपुने महाराज यांचे प्रवचन झाले,व संध्याकाळी काळभैरवनाथ भजणीमंडळ.काळभैरवनाथ प्रासहीक दींडी यांच्या वतिने थोर आदिवासी समाजसेवक व साहित्यिक.नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या घरी भजन गायन आर्जुन ग चौधरी,सुभाष किसन चौधरी,आर्जुन चौधरी,रामचंद्र नामदेव पवार, ज्ञानोबा शेलार विलास चौधरी,ज्ञानदेव चौधरी,विठ्ठल हगवणे,शिवाजी चौधरी,विष्णु क्षीरसागर पखवाज वाहक ,काळभैरवनाथ दिंडीच्या वतीने नायगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहाण्यात आली .

या वेळी जेष्ट लेखक भास्कर भोसले,तुकाराम भोसले,पत्रकार.सुनिल भोसले,बाळासाहेब चौवरे,राजेंद्र टिळेकर,गणेश देवी,राजेंद्र भोसले, बलवर पवार,कुणाल भोसले, अलकाताई तानाजी गायकवाड सुजाता ज्ञानदेव भोसले सुरेखाताई तुकराम भोसले राजश्री ज्ञानदेव भोसले, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थित होते. आदिवासी पारधी समाजांमध्ये महाराष्ट्र राज्यातून पहील्यांदा संतरुपी ज्ञानदेव बाबांच्या तेराव्या विधीनिमित्त भजन करण्यात आहे,त्यामुळे आम्ही भाग्यवंत झालो असे वाटले ते म्हणतात ना भाग्यावंता घरी भजन -पुजन त्याची वाट पाहे रघुनंदन..