✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)
महागाव(दि.26 सप्टेंबर) :-पडत्या पावसात नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या योग शिबिराला हजेरी लावून योगा केला .
पतंजली योग पिठ द्वारा महागाव येथे दिनांक २५ सप्टेंबर ते २ऑक्टोंबर २०२३ पर्यंत आयोजित सात दिवशीय भव्य निशुल्क योग शिबिराची सुरुवात मुख्य मार्गदर्शक प्रकाश वानरे( प्रभारी पतंजली योग समिती पुसद),सौ माधुरी वानरे (जिल्हा प्रभारी महिला), कैलास भांगे (योगशिक्षक)यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे मुख्य आयोजक जगदीश नरवाडे( अध्यक्ष व्यापारी महासंघ महागाव )मुख्य अतिथी माजी आमदार राजेंद्र नजरधने ,सौ नजरधनेताई,, मुक्तेश्वर पद्मावार (महामंत्री भारत स्वाभिमान पुसद) सुभाष पदमवार (संघटन मंत्री पतंजली किसान समिती पुसद), प्रदीप गंगमवार (प्रभारी व पदाधिकारी पतंजलि योग समिती महागाव) विजय सूर्यवंशी, महेश चक्करवार,गोपी चक्करवार यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून करण्यात आली.
शिबिरामध्ये दैनिक हवन यज्ञाचे यजमान जगदीश नरवाडे व सौ रसिका नरवाडे हे होते. शरीरासाठी आवश्यक यज्ञामध्येअनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती वापरल्याने परिसरात सुगंध दरवळत होता आजच्या प्रथम दिवशी प्राथमिक योग अभ्यास करून योग शिबिर संपन्न झाले. उद्यापासून शिबिरात आसन ,व्यायाम ,प्राणायाम , शुगर,ॲक्युप्रेशर, हस्तमुद्रा, आयुर्वेद उपाय याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
आज सकाळ पासुनच पावसाने हजेरी लावली असताना सुध्दा कार्यक्रमास्थळी योग अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात पुरुष ,स्त्रिया लहान बालकांनी हजेरी लावली होती जगदीश नरवाडे प्रदीप गंगा संजय शेषराव नरवाडे विजय सूर्यवंशी ज्ञानेश्वर काप्रतवार श्रीकांत माळोदे अशोक आणा स्वप्निल नरवाडे व्यंकटेश सिरमवार चंद्रकांत कदम डॉ संतोषजी मोटरवार.
चिमुकला चिन्मय ठरला सर्वांचे आकर्षण
महागाव येथे आयोजित योग शिबिरामध्ये महिला,पुरुष,युवकांनी तर आपली हजेरी लावून योगाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती.परंतु या सर्वांमध्ये सात वर्षीय चिन्मय मंगेश वानखेडे पाटील या चिमुकल्यांनी उपस्थित राहून योगाचे पाठ शिकण्यास सुरुवात करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला असुन या शिबिरात तोच सर्वांचे आकर्षण ठरला होता.