🔸गावकऱ्यांचा ग्रामपंचायत विरोधात आक्रोश
✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.22 एप्रिल) :- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिनोरा पिपरबोडी (पारधी टोला) येथे भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश दिसून आला ,हंडाभर पाण्यासाठी तासणतास नळाजवळ बसावे लागते, माझा नंबर कधी येईल व मी हंडाभर पाणी केव्हा भरेल याची वाट पाहावी लागते,यातच महिलां मध्ये आपसात भांडणे सुद्धा होतात.
गावात सौर उर्जेवर चालणारा एक पंप होता तो ना दुरुस्त पडलेला आहे नविन पंप आहे परंतु त्याची पाणी ओढण्याची क्षमता कमी असल्याने टाकीत पाणी चढत नाही , वारंवार ग्रामपंचायत ला तक्रारी देउन सुद्धा ग्रामपंचायत सचिव सरपंचांनी दुर्लक्ष केले , ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात सौर उर्जेवरवरिल पंप कामच करत नाही गावात बोरवेलला पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे विजेवर चालणारे पंप बसवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.
पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत ने टॅंकरने पाणी पुरवठा करावा , जिल्हा परिषद चंद्रपूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नविन पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले परंतु आजवर योजना प्रभावीपणे राबविली नाही याकडे पाणीपुरवठा अभियंत्याचे कमालीचे दुर्लक्ष दिसुन येत आहे आहे,टाकी ही शोभेची वस्तू बणलेली आहे,टाकी आहे पाणी नाही, असंच म्हणावं लागेल , लवकरात लवकर आम्हाला पाणी पुरवठा करावा अन्यथा पंचायत समिती समोर आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.