✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .25 ऑगस्ट) :- शहरातील मुख्य रस्त्यावरील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाजवळ व शिंदे पेट्रोल समोर गुरुवार दि .२२ ऑगस्ट वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहेतेश्याम अली यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष केशव महाराज मेश्राम यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी सामाजिक.कार्यकर्ते चंद्रकांत गुंडावार, धर्मेंद्र हवेलीकर, विनोद पांढरे,विवेक सरपटवार, हाजी जावेद शेख, आशिष ठाकरे, संदीप विधाते, धनराज पायघन, राजू सातपुते, प्रणिता शेंडे, लता भोयर, मधुकर ठाकरे, आतिश बोरा, हाजी शाहिद अली, प्रतिभा सोनटक्के, केशवानी,प्रशांत शिंदे, तुळशीराम श्रीरामे,सुधाकर रोहनकर,विजय वानखेडे, रवि पवार,सत्तार शेख आदी मान्यवर उपस्थित होते. भद्रावती शहरातील व तालुक्यातील सामान्य नागरिकांचे प्रलंबित कामे कशी हाताळता येईल आणि जनतेशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने हे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले.
असल्याचा मनोदय अहेतेशाम अली यांनी यावेळी व्यक्त केला .तसेच तल्यक्यातील नागरिकांचे कामे होत नसल्यास त्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी वृंदावन सेलिब्रेशन हॉल मध्ये शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.