भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळी केंद्रावर  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते  शेतमाल खरेदीचा शुभारंभ

🔸पहिल्याच दिवशी ४६५१ रु. प्रति क्विंटल दराने १०५ क्विंटल सोयाबीनची खरेदी

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.26 ऑक्टोबर) :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नंदोरी उपबाजार आवार क्षेत्रील मे. अदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी खरेदी केंद्रावर   मे. शेंडे ऍग्रो ट्रेडर्स अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ काल  दि. २४ ऑक्टोंबर रोजी  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते  शुभ हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी ४६५१ रु . प्रति क्विंटल दराने १०५  क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली . 

           याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र  शिंदे तर प्रमुख अतिथी  म्हणून बाजार समितीचे सभापती तथा  उप-जिल्हा प्रमुख  भास्कर ताजने, कृ.उ.बा.स.च्या उपसभापती तसेच भद्रावती तालुका संघटीका अश्लेषा (भोयर) जिवतोडे यांच्यासह उप-तालुका प्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.समिती संचालक  गजानन उताणे, संचालक  कान्होबा तिखट, परमेश्वर ताजणे, राजेंद्र डोंगे,  प्रवीण बांदुरकर, राजु आसुटकर व  सर्व संचालक तसेच सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह मे. अदिती काँटन इंडस्ट्रीजचे  अविश बाहे, सुभाष बाहे आणि किशोर वालदे, मे. शेंडे ऍग्रो ट्रेडर्सचे  गुणवंत शेंडे उपस्थित होते.         

    याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेले  शेतकरी कांन्सा ( शिरपूर )  येथील हरिदास रोडे , कोंढा येथील अरुण राजूरकर , मासळ येथील पुरुषोत्तम आसुटकर , जेना येथील संजय ताजणे आणि टाकळी येथील  संदीप ढेंगळे यांचा सत्कार करण्यात आला. 

         कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी   विठ्ठल टोंगे, विलास पालकर, रमेश सकिनवार व गणेश नागोसे यांनी सहकार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला शेतमाल उपबाजार आवार नंदोरीच्या उपबाजार आवार मे. अदिती काँटन इंडस्ट्रीज टाकळी येथे विक्रीस आणावा. असे संयुक्त आवाहन भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  भास्कर ताजने, उपसभापती  अश्लेषा (भोयर )जिवतोडे आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले.