🔸विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.14 डिसेंबर) :- स्थानिक बगडेवाडी येथे दि. १८ , १९ व २० डिसेंबर रोजी श्री साईबाबा स्थापनादिन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर उत्सवाचे हे नववे वर्ष आहे.
दि. १८ डिसेंबर रोजी श्री साईबाबा मूर्ती पूजन, घटस्थापना व आरती, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज यांचे साईदर्शन चरित्र या विषयावर प्रवचन, श्री साईबाबाची आरती आणि घाटंजी येथील ह.भ.प. राजू विरदंडे महाराज व संच यांचे राष्ट्रीय कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे.
दि. १९ डिसेंबर रोजी श्री साईबाबा मूर्ती पूजन व आरती,ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज व समस्त महिला व पुरुष सत्संग मंडळ यांच्यावतीने ज्ञानेश्वरी हरिपाठ सादर करण्यात येईल. श्री साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रा काढण्यात येईल. या शोभायात्रेत कलशधारी महिला भगिनी, भजन दिंडी, श्री साईबाबाच्या जीवन चरित्रावर आधारित विविध दृश्य, संतोषी बँड पथक आणि दुर्गा वाहिनी ध्वज पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण असेल.
सदर शोभा यात्रेचा मार्ग श्री साईबाबा मंदिर बगडेवाडी – जुने वडाचे झाड – विठ्ठल मंदिर – किल्ला वार्ड – भोजवार्ड – वाल्मीक चौक- जंगल नाका – जुना बस स्टॉप – गांधी चौक मार्गाने परत प्रारंभ स्थळी शोभा यात्रेचा समारोप होतील. रात्रोला ओम साई भजन मंडळ किल्ला वार्ड जागृती भजन सादर करतील.
दि. २० डिसेंबर रोजी ह. भ.प. भुजंग खानोरकर महाराज यांच्या हस्ते साईबाबा मूर्तीचा अभिषेक, गजानन क्षिरसागर व संच भजन संध्या सादर करतील, नागपूर येथील ह.भ.प. निंबाजी तागड महाराज व संच यांचे किर्तन ,गोपाल काला, अहवाल वाचन, श्रद्धांजली, आभार प्रदर्शन आणि महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.