भटाळा येथे फराळ वितरण संपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.20 ऑगस्ट) : -श्रावण सोमवाराच्या निमित्ताने भटाळा येथे डाॅ.चेतन खुटेमाटे मित्र मंडळाच्या वतीने फराळ वितरण करण्यात आले.श्रावण महिण्यात दर सोमवारला शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी वरोरा तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या निमित्याने चला बदल घडवूया या कार्यक्रमा अंतर्गत डॉ चेतन खुटेमाटे प्रसिध्द नेत्रतज्ञ यांच्या मार्फत फराळ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भटाळा येथिल सरपंच कु.धम्मकन्या भालेराव,डाॅ.निलेश झिले,गजानन देहारी,रमेश चौधरी,सतिश परचाके,संतोष कुचनकर,संदिप सोनेकर,संतोष भोयर,उपस्थित होते.फराळ वितरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गौरव दाते, कृष्णा तुमराम, गणेश दानव, विशाल झाडे, मधुकर दाते, प्रज्वल बावणे, सुरज बावणे,संकेत गोहोकर,वैभव उमरे यांनी अथक प्रयत्न केले.