बोडखा मोकाशी येथे रक्तदान शिबीर

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .26 सप्टेंबर) :- तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे श्री गणेश व गजानन महाराज यांच्या मूर्तीला वंदन करून,अष्टविनायक गणेश मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज बोडखा व अमन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. 

 मंडळाच्या वतीने काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावा अशी डोक्यात कल्पना टाकून अष्टविनायक गणेश मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपच्या सदस्यांनी बोडखा गावात रक्तदान शिबीर घेतले.

 जवळपास 50 रक्तदात्याणी रक्तदान दिले.

त्यावेळी अष्टविनायक गणेश मंडळचे समस्त सदस्य अमित कामडी, समीर तुराळे, अंकित थाटे, मयूर तडस, मयूर बगणे, संकेत तडस, शुभम तुराळे, माधव कामडी, छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप चे अध्यक्ष आदर्श घेणंघारे, उपाध्यक्ष तुषार बलखंडे, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, पवन बलखंडे,आशिष तुराळे, आशिष थाटे, निखिल थाटे, तन्वीर थाटे, साहिल कामडी,किसना कामडी, आदित्य घेणघारे व समस्त खांबाडा पंचायत समिती मधील रक्तदाते उपस्थित होते.