बोडका (मोकाशी) येथील शेतकर्‍याची दुधाळ म्हैस सर्पदंशाने मृत्यू

🔹तात्काळ व भरीव मदत द्यावी:-विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.30 जुलै) :- वरोरा तालुक्यातील बोडका (मोकाशी) येथील शेतकरी साईबाबा अवचट यांची दुधाळ म्हैस सर्पदंशाने मरण पावली. शेतकरी संकटात सापडला असून त्याला तात्काळ व भरीव मदत द्यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे व युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या सूचनेनुसार विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी तात्काळ शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बोडका येथील शेतकरी यांनी म्हैस मरण पावली त्या बाबत अभिजित कुडे याना कॉल करून माहिती दिली. तात्काळ अभिजित कुडे यांनी घटनास्थळी जाऊन पशु वैद्यकीय अधिकारी यांना कॉल करून तात्काळ पंचनामा करावा अशी सूचना केली. नुकतेच शेतकऱ्याने 1 लाख 10 हजार किमतीची मुर्रा प्रजातीची म्हैस घेतली होती.

गाभण असून 3,4 दिवसात प्रजनन झाले असते पण गोठ्यात बांधुन असताना सर्पदंश होऊन म्हैस मरण पावली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसाय वर अवलंबून आहे. इतक्या किमतीचे जनावर असे मरण पावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे तात्काळ व भरीव मदत द्यावी अशी मागणी विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी केली आहे. संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे असा आधार त्यांनी शेतकर्‍यांना दिला.

तातडीने स्वतः अभिजित कुडे यांनी जाऊन पाहणी केली पंचनामा करून घेतला व पाठीशी उभा राहणार असा आधार दिला हे शेतकऱ्याला धीर मिळाला. जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे यांनी नेहमी तुमच्या सोबत आहे कोणतीही अडचण आल्यास शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी याना कळवा तुमच्या मदतीस धावून येणारा असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रोशन भोयर, वैभव पावडे, कुणाल कांबळी, शुभम डफ,सूरज अवचट उपस्थित होते.