बोगस खत बि-बियाने पास करणाऱ्या अधिकारी यांच्या वर कार्यवाही करा.शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 मे) :- खरिप हंगामा साठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत बि-बियाणे खरेदी करतो.काही कृषी संचालकांवर हे आपल्या फायद्यासाठी बोगस खत बि-बियाणे आणतात व शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस बि-बियाणांची विक्री करतात.परंतु काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी असे बोगस खत बि-बियाणे पास करतात. तर अशा बोगस खत बि-बियानाची विक्री करणाऱ्या अधिकारीऱ्यावर बोगस खत बि-बियाणे विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कार्यवाही या दोन्ही व्यक्तीवर कोठार कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.

करण यापूर्वीही अनेक वेळा बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यावर दुबारा पेरणीची वेळ आली आहे.ती वेळ येऊ नये म्हणून बियाणे खरेदी विक्री करिता असताना कच्ची पावती न घेता पक्की पावती कृषी संचालक कडून घ्यावी असे आवाहन उमरे यांनी केली आहे मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे केलेले कष्ट मातीत गेले म्हणून दुबारा पेरणीचे संकट पुन्हा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.जर दुकानदार पावती खत बियाण्याची किंमत पावती सिरीयल नंबर या सर्व गोष्टी बघून शेतकऱ्यांनी कच्ची पावती न घेता पक्की पावती घ्यावी असे आव्हान शेतकऱ्याचे उमरे यांनी केले. 

“बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करुन परवाना रद्द करण्यात यावे आणि असे बोगस बियाणे पास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी दिला.”