🔹किशोर टोंगे यांच्या वतीने पोळ्यानिमित्त आयोजित स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.10 सप्टेंबर) :- राज्यात पोळा हा शेतकरी बांधवांचा लोकप्रिय सण असून या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोडीची सजावट करून त्याची पूजा करतो. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून आपल्या शेतकरी बांधवांकडून गावागावात बैल पोळा उत्साहात साजरा केला जातो. कृषी संकृतीत पोळ्याला महत्वाचा सण मानला जातो.
बैल पोळा सणाचे औचित्य साधून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सजावट केलेय बैलजोडीचे फोटो किशोर टोंगे यांच्या कार्यालयाला पाठवायचे होते. या स्पर्धेत वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून बैलजोडी स्पर्धेच्या विजेत्यांना दि. ८ सप्टेंबर रोजी किशोर टोंगे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त आयोजित कार्यक्रमात श्री. हंसराज अहिर, अध्यक्ष मागासवर्ग आयोग भारत सरकार यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट बैलजोडी सजावट म्हणून निवड झालेल्या शेतकरी बांधवांना विविध जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या.
शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबत असतो आणि त्याला तितकीच तोलामोलाची साथ बैल देत असतात. यातूनच या प्राण्यापोटी एक जिव्हाळयाच नात तयार होत असत त्यातूनच शेतकरी आपल्या बैलांची सजावट करतो त्यांना गोडधोड खाऊ घालतो व त्यांची पूजा अर्चा करत असतो. त्यांच्या या आनंदात सहभागी होण्याच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केली.
या उपक्रमाची दोन वर्षापासून सुरवात केली असून शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत याचा आनंद आहे अशी भावना किशोर टोंगे यांनी व्यक्त केली व यावेळी बोलताना त्यांनी सर्व विजेत्यांचे मनापासून आभार मानले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिनोरा ता.वरोरा येथील शेतकरी नितेश ठमके, द्वितीय क्रमांक महालगाव ता. वरोरा येथील जीवन माकोडे तर तृतीय क्रमांक विभागून आदित्य बोधाने तुमगाव, आदर्श चांभारे नंदोरी, संदीप आसुटकर जामगांव, रोशन पुसदेकर सोईट, पुरुषोत्तम चंदनखेडे माढेळी यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांना फ्रिज, द्वितीय टीव्ही तरी तृतीय क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांना मिक्सर भेट देण्यात आला असून एकूण 57 शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सागर वझे, ओमभाऊ मांडवकर,प्रवीण ठेंगणे, गोपाल वर्मा, डॉ. अंकुश आगलावे, कीर्ती कातोरे, प्रणिता शेन्डे, संगीता निंबाळकर,अनिता दुशेट्टीवार,सुरेश महाजन,विजय वानखेडे देविदास ताजने व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव लोहकरे यांनी तर आभार प्रदर्शन शुभम आमने यांनी केले.