✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.11 जून) :- अपर आयुक्त आदिवासी विभाग, नागपूर तर्फे आयोजित यशप्राप्त आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा डाँ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात नुकताच संपन्न झाला. क्रांतीवीर शहिद बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रांजली परमानंद तिराणिक या बाल चित्रकर्तीने आपल्या कलेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील ज्या ४० तरूणांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे.
तसेच युपिएसी upsc प्राविण्यप्राप्त विद्यार्थी राहुल आत्राम, जेईई आणि निट या परिक्षेत यशस्वी झालेल्या 96 विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून तसेच ‘झुंड’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार पटकविणारा अमिताभ बच्चन सोबत मुख्य भुमिका साकारणारे आदिवासी कलावंत ‘अभिनेता अंकूश गेडाम यांचा प्रांजली परमानंद तिराणिक या बालचित्रकर्तीने त्यांचीच प्रतिमाचे रेखाटन करून या शानदार कार्यक्रमात ते रेखाचित्र भेट दिले. यावेळी अंकुश गेडाम यांनी या रेखाचित्राचे रेखाटन बघून भारावून गेले व म्हणाले’ झोपडपट्टीत आलेल्या माझ्यासारख्या मुलाला नागराज मंजुळे यांनी चित्रपटात संधी दिली.
चित्रपटाआधी आणि नंतर मी अनेक प्रकारची कामे केली, संघर्ष केला कदाचित याच संघर्षामुळे आज माझ्या पदरात राष्ट्रीय फिल्मफेअर सारखे यश पदरी पडले असावे. अशी भावना अभिनेता अंकुश गेडाम यांनी बोलून दाखवली. यावेळी मा.ना. नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग भारत सरकार प्रामुख्याने उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे, आमदार संदिप धुर्वे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, दिनेश शेराम आदिंची उपस्थिती होती.