🔸जिल्हा दंडाधिकारी व रेती घाट लिलाव आदेश व अटी, शर्तीचे घाट मालकाकडून उल्लंघन
🔹1 करोड 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.2 मार्च) :-तालुक्यातील वणा नदीतील मौजा बामरडा रेती घाटातून प्रोक्लेम मशिनद्वारे रेतीचा अवैध उपसा करून काही हायवा ट्रक मध्ये भरून वाहतूक करीत असल्याची माहिती28 फरवरी 2023 ला प्राप्त झाली.
प्राप्त माहितीचे आधारे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचे सहकार्याने सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी सपोनि अजित देवरे,निलेश चवरे,मनोहर आमने,गुरू शिंदे यांचे मदतीने तसेच भद्रावती तहसीलदार सोनवणे, मंडळ अधिकारी बऱ्हाणपुरे ,तलाठी अशा महसूल पथकाचे मदतीने संयुक्तरित्या छापा घातला.
त्यावेळी रेटिघाट मालक व त्याचे सहकारी यांनी नदीचे पात्रात दगड माती टाकून नदीचे पाण्याचे प्रवाहाची दिशा वळवून रेती दोन प्रोक्लेम मशीनचे साहाय्याने जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचे व रेतीघाट लिलाव आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन करीत रेती उत्खनन करीत असता आढळून आल्याने मौजा बामरडा रेती घाटातून 2 प्रोक्लेम मशीन,9 हायवा ट्रक,एक गाडी पिकअप आणि ट्रक्स मध्ये भरलेली रेती असा एकूण 1,63,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला.
व घटमालक आरोपी मोहम्मद इमरान मो.सिद्धीकी ,मुन्ना सिद्धीकी व सुपरवायझर वाहन चालक,वाहन मालक असे इतर आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम 379,430,431109,188,34 भादवी सहकलम 48 (7) (8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे.त्याचप्रमाणे महसूल विभागाकडून दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.