बांद्रा येथे शिवसेना (उबाठा) शाखेच्या फलकाचे उद्घाटन

🔸जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरूच 

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .2 ऑक्टोबर) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या अभियानांतर्गत वरोरा तालुक्यातील बांद्रा गावात शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. 

शाखा उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक शिवसैनिकांसह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गावात शिवसेनेची शाखा स्थापन झाल्यामुळे शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. जिल्हाप्रमुख जिवतोडे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या धोरणांची महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुढील कार्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

या शाखेच्या माध्यमातून गावातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षाची भूमिका ग्रामीण भागात अधिकाधिक पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अशा शाखांचा विस्तार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, बाजार समितीचे माजी संचालक राजू आसुटकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, माजी शाखा प्रमुख प्रभाकर हरणारे, देवराव दडमल, युवासेना उपतालुका प्रमुख रुपेश चिंचोलकर, शाखा प्रमुख सूरज दोहतरे, मंगेश खांडेकर, उपशाखा प्रमुख अमृत दडमल, कोषाध्यक्ष सतीश हक्के, सहसचिव कडूजी खांडेकर, कमलाकर मगरे, हर्षल ढोक, पंकज खापने व आदी उपस्थित होते.