बस व दुचाकीच्या धडकेत मुलगा ठार

🔹वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग भेंडाळा येथील घटना

🔸जवळपास चार तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

🔹घटना स्थळी चार तास नंतर दंगा नियंत्रक पथक दाखल

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव (दि.20 ऑक्टोबर) :- आज सकाळी ७ च्या सुमारास शेगाव वरून जवळ असलेल्या भेंडाळा पाटीवर दुचाकी व एसटी महामंडळाच्या बस च्या झालेल्या धडकेत १५ वर्षे दुचाकी चालक सृजल राजू साळवे घटनास्थळी ठार झाला असून मागील चार तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.

प्राप्त माहितीनुसार सृजल हा रविवार सुट्टी असल्यामुळे बजाज कंपनीची सिटी १०० बाईकने क्र. एम. एच. ३४ बी. एस. ९४४६ गावातून शेतामध्ये जात असताना चिमूर चिमूर कडून शेगाव कडे येत असलेल्या बसने धडक दिली,चिमुर आगाराच्या बस क्र. एम. एच. ४० बी. एल. ३९८८ चिमूर चंद्रपूर सुपर बसणे धडक दिल्यामुळे जागेवरच ठार झाला. ही धडक एवढी भीषण होती की सृजल हा धडक बसताच बसच्या काचेवर जाऊन आदळला.

बाईक बसच्या समोरील चाकात येऊन १०० मीटर घासत गेली. ही घटना गावकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना माहिती होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले व जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग बांधणारे कंपनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला देत नाही तसेच गावातून मुख्य महामार्गांवर येणारा रस्ता करून देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन राष्ट्रीय महामार्ग मागील चार तासापासून रोखून धरलेला होते .

स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण जमाव आपल्या अटीवर कायम राहिले. शेवट दोन तासानंतर चिमूर पोलीस उपनिरीक्षक राकेश जाधव हे घटनास्थळी पोहोचुन सुद्धा जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मृतदेह उचणार अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे महामार्ग सुरळीत करण्यात आला नव्हता. रस्ता बांधकाम कंपनी व नागरिक यांच्यात बोलचाल सुरू असून मागील चार तासापासून राष्ट्रीय महामार्ग हा ठ्ठप पडून दोन्ही बाजूला वाहणाच्या लाबंच लांब रांगा लागलेल्या आहेत. 

अखेर चार तास नंतर जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून दंगा नियंत्रण पथक चंद्रपूर यांना पाचरण करण्यात आले..

ही घटना झाल्या नंतर घटना घडलेल्या एस. टी. बस चे चालक जवळील पोलिस स्टेशन येथे स्वतःहून जमा झाले…या सर्व प्रकरणाचा गंभीर तपास येथील ठाणेदार श्री योगेंदरसिंग यादव करीत आहे .