✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.15 सप्टेंबर) :- गडचांदूर – राजुरा मार्गावर कापणगाव जवळील पेट्रोल पंप जवळ कापणगाव येथील रहिवाशी प्रकाश बोढेकर (वय ५०) हे राजुरा येथून सायंकाळी सात वाजता च्या सुमारास घराकडे परत येत असताना यांच्या मोटरसायकलला गडचांदूर कडून येणाऱ्या बसने बे धडक दिल्याने प्रकाश बोढेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
हि घटना माहिती होताच लोकांनी जमाव करून प्राप्त माहिती राजुरा पोलीस यांनी दिली .
मृतक प्रकाश बोढेकर हे काही कामानिमित्त राजुरा येथे गेले होते. सायंकाळी सात वाजता काम करून दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए क्यू १४६४ या गाडीने घराकडे येत असताना गावा जवळच असलेल्या पेट्रोल पंप जवळ गडाचांदुर कडून येणाऱ्या बस क्रमांक एम एच 40 एन 94 60 जोरदार धडक दिल्याने प्रकाश बोढेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी होताच घटनास्थळी गर्दी केली. काही वेळातच राजूरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीला पाठविले आहे. प्रकाश बोढेकर यांना दोन मुले आहे.
यांच्या एकाकी निधनाने गावात सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच घराचा कमावणारा गेला आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमरीचीवेळ येते आल्याने त्यांच्या कुटुंबाला शासणा कडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती . सदर घटनेचा पुढील तपास राजुरा येथील पोलीस कर्मचारी करीत आहे.