बडनेरा रेल्वे कार्यालय अधीक्षक श्री मनोज सर यांचा वाढदिवस साजरा

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि 20 ऑगस्ट) :- अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बॉक्सर राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री मनोज सातणकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

          अमरावती बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरातील गोरगरीब लहान मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले. श्री मनोज सातनकर यांच्या सर्व मित्रमंडळी मिळून वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला यावेळी महाराष्ट्र पोलीस न्यूज चिखली तालुका अध्यक्ष पत्रकार सारंग महाजन हे सुद्धा उपस्थित होते .

       ज्या विद्यार्थ्यांना बॉक्सिंग ची आवड आहे त्यांना ते नेहमी मार्गदर्शन करत आहेत . भुसावळ येथे बॉक्सिंग चे कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सर्वांचे लाडके व सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करणारे रेल्वे कार्यालयात सर्वांना घेऊन चालणारे श्री मनोज सातनकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.