फरीद बाबाच्या भक्तासाठी भव्य भोजन दानाचे आयोजन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.16 जुलै) :- 

स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या मेसा येथे वरोरा चिमूर महामार्गावर हजरत फरीद बाबा चा दर्गा असून याच सोबत जंगलात टेकळी येथे देखील निसर्गाच्या सानिध्यात फरीद बाबा चा दर्गा आहे या दर्ग्यालगत एक छोटीशी विहीर एक झरा आहे या ठिकाणी सदैव बाराही महिने पाणी असून हा झरा वाहत असतो तर येथील पाणी हे पिण्यासाठी गोड असून पवित्र असल्याचे भाविक मानतात .

मोहरम या सणाच्या पावन मुहूर्तावर सहावी या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच परिसरातील अनेक सवाऱ्या तसेच भाविक मोठ्या संख्येने मेसा येथे येत असतात व फरीद बाबाच्या दर्ग्यावर नतमस्तक होतात तर सवारी चा रश पाहण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी येत असल्याने आलेल्या भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय न व्हावी व दूरवरून येणारे भाविक हे वीणा पाण्याने व उपाशी न राहावे या करिता दरवर्षी माठे कृषी केंद्र शेगाव बूज. चे संचालक श्री विनोदभाऊ माठे हे आपल्या स्वखर्चातून गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांसाठी मसाले भात , बुंदी, पिण्यासाठी थंड पाण्याची सोय करीत असतात .

त्यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे मेसा वासिय देखील त्यांना सहकार्य करून भाविक भक्ताच्या सोई करिता हातभार लावतात. दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक , महिला , तरुण ,तरुणी , बालक , येत असल्याने या ठिकाणी कसलाही प्रकारचा दंगा भांडण छेड छाड होणार नाही याचं सोबत या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागू नये या करिता पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेंदर सिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई प्रफुल कांबळे यांच्या सह पोलीस ताफा होमगार्ड गृहरक्षक सैनिक चौका चौकात तैनात करण्यात आले होते..या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट ग्रामपंचायत मेसा चे उपसरपंच श्री नीळकंठ वरभे , देविदास पोइनकर,प्रमोद कातोरे, राजू दडमल , अविनाश वरभे , महेंद्र मुंगले, दिनेश किंनाके,गंगाधर कुमरे,परमेश्वर जिवतोडे, वसंता मडावी , धनराज मडावी ,शंकर वंजारी ,अनिल ढोणे , व गावातील अनेक युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.