प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या हस्ते युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांचा गौरव

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.28 जुलै) :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेड जिल्हा व मैत्री युवा विकास प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमात, दिनांक 28 जुलै 2024 रोजी. स्थळ शिव- पार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे ग्रंथ प्रेमी, सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार, निवेदक, गायक, समीक्षक, मिमिक्रीकार, मानवी कल्याणाचा बादशहा, गोरगरीब जनतेची हेल्पलाईन, नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असणारे युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे संचालक स्वामी विवेकानंद अकॅडमी, परभणी यांच्या हस्ते युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी,

         कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवहरी गायकवाड सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, नांदेड, कार्यक्रमाचे आयोजक माधव गायकवाड, कु. ज्योती सोनटक्के, राजेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.