▫️प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांची मागणी(Demand of Prahar Sevak Akshay Bondgulwar)
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.26 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील शेगाव बू हे मोठे गाव असून परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे तर या गावाशी अनेक गावाशी निगडीत संबंध असून शेतकरी बांधवांना शेती संबधित देवाण घेवाण करण्यासाठी शेगाव येथेच यावे लागते तर शिक्षण घेण्यासाठी देखील परिसरातील विद्यार्थ्यांना येथेच यावे लागते. तर मुख्य म्हणजे नागरिकांचा महत्वाचा विषय म्हणजे आरोग्य यासाठी देखील अनेक नागरिकांना उपचार करिता येथेच यावे लागते .
आरोग्याचा विषय लक्षात घेता शासकीय सुविधा पुरेशी नसल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागते त्यामधे गोर गरीब कष्ट करणारे मजूर यांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागते . शिवाय प्रसूती गरोदर मातांना देखील उपचार प्रसूती करिता वरोरा येथे जावे लागते .
तर काही माता उपचार अभावी अनेक संकटाचा सामना करून मृत्यूशी झुंज देत असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळते तेव्हा या गंभीर समस्या कडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष असल्याने येथील तसेच परिसरातील जनतेच्या आरोग्याचा विषय अंधारमय आहे. करिता शेगाव बू येथे करोडो रुपये खर्ची होऊन सुसभ्या असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रची इमारत नुसती धूळखात आहे तेव्हा या नवीन इमारती मध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी येथील युवा प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी केली आहे ..
येथे मागील पाच ते सहा वर्षापासून आरोग्य केंद्राची इमारत करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले परंतु परिसरातील जनतेला मात्र आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे…
शेगाव तालुक्यात मोठे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली असून लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे परिसरातील 50 ते 60 जनता शेगावला रोज खाजगी दवाखान्यात उपचाराकरीता येत असून या ठिकाणी उभी असलेली करोड रुपयाची इमारत धुळखात पडलेली असून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी, लहान मुले, महिला, नागरिकांसाठी आरोग्य उपचार करीता, उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न दूर होईल.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे वॉल कंपाऊंड ,गेट ,इतर बांधकाम पूर्ण करून प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सुविधे करता लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी केलेली आहे.