प्राथमिक शाळा भोकरवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप 

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.7 जुलै) :- 

चिखली तालुक्यातील भोकरवाडी येथे चिखली येथील सुप्रसिद्ध युवा व्यापारी अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारे कुशाग्र बुद्धीचे नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून धावून जाणारे सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे व्यापारी संतोष काळे यांनी भोकरवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये मुलांना पाट्या ,वह्या, पेन ,पुस्तके, खोड रबर ,पेन्सिल शालेय इ. साहित्याचे वाटप करण्यात आले.

वाटप करतेवेळी युवा व्यापारी श्री संतोष काळे व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय इंगळे सर या दोघांनी मिळून शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. शालेय साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थी अतिशय आनंदित होते. युवा व्यापारी संतोष काळे यांनी शालेय साहित्याचे वाटप केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.