✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.13 नोव्हेंबर) :- आज प्राथमिक आरोग्य केंद्र मुधोली येथे कुटुंब कल्याण कॅम्प सुरू असतानाच अचानक गॅस शेगडीचा पाईप फुटल्याने अचानक भीषण आग लागली , त्यामुळे संपूर्ण दवाखान्यांची अफरा तफरी झाली व ऑपरेशन थेटर मद्ये डॉ. गेडाम मॅडम हे ऑपरेशन करत होते .
सदर आग आटोक्यात आणण्यासाठी डॉ. राजू बोबडे वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतचं जीव धोक्यात टाकून आगीवर नियंत्रण करण्यात यशस्वी झाले. तो पर्यंत दवाखान्यातील इतर कर्मचारी वर्गाने सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढले .
सदर घटनेत कोणतेही दुखापत किंव्हा जीवितहानी झाली नाही आणि डॉ . राजू बोबडे वैद्यकीय अधिकारी यांनी केलेली कामगिरी , धाडस या बद्दल परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी दवाखान्यात नवीन अग्नीशमक अलार्म पाईप लाईन बसवण्यात आली असून कोणताही अलार्म वाजला नाही किंव्हा ही पाईप लाईन कामी पडली नाही , यावर वैद्यकीय अधिकारी मनाले की अग्नीशमक अलार्म पाईप लाईन च काम सुरू असल्याचे डॉ. राजू बोबडे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आणि डॉ. राजू बोबडे यांच्या सतर्क पणामुळे आज मोठी जीवित हानी , नुकसान होण्यापासून वाचवले .