प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख अपघातात जखमी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.12 जून) :- 

स्थानिक शेगाव बू येथील प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर चे जिल्हा प्रमुख श्री शेरखान पठाण यांचा अपघातात गंभीर झाल्याची घटना घडली. सविस्तर असे की येथील जिल्हा प्रमुख शेरखान पठाण हे स्थानिक शेगाव येथील रहिवासी असून जवळच असलेल्या गूजगव्हाण चौरस्त्यावर त्यांचे आशीर्वाद हॉटेल व रेस्टॉरंट आहे त्या करिता शेगाव येथील सोमवार आठवळी बाजारातून किराणा तसेच भाजीपाला हॉटेल मध्ये नेत असता रात्री सुमारास साडे आठ च्या सुमारास चारगाव धरणा जवळच अपघात झाला .

सदर चारगाव ते राळेगाव या मुख्य मार्गावर काटेरी बाभळीचे घनदाट बन असून या काटेरी बनात रानटी डुकर तसेच सद्या मोकाट असलेले जनावरे पाणी पिण्यासाठी धरणावर येत असतात. रात्री हे जनावरे अचानक पणे भर रस्त्यावर मुख्य मार्गावर येत असतात. अश्यातच जिल्हा प्रमुख पठाण हे देखील रोजच्या प्रमाणे येत असल्याने अचानक म्हशीचा कळप रस्त्यावर आला व समोर येत असलेल्या मोठ्या वाहनाच्या प्रकाशने त्यांना म्हशीचा कळप न दिसल्याने म्हशीचा कळप समोर समोर आला यात धळक दिल्याने पठाण व त्यांचे मित्र यांना जबर मार लागला गावकऱ्यांच्या सहकार्याने शेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आला .

आता त्यांची प्रकृतीत सुधारणा असून उपचार सुरू आहे. तेव्हा चारगाव तसेच राळेगावं या मार्गावरील काटेरी बाभळीचे बन तत्काळ नष्ट करून चांगल्या वृक्षाची लागवड करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.