✒️होमेश वरभे (माढेळी प्रतिनिधी)
माढेळी(दि.21 जून) :- चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येत असलेल्या माढेळी बाजार या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संस्थापक माननीय आ. बचुभाऊ कडू दिव्यांग मंत्रालय दर्जा प्राप्त. यांच्या मार्गदर्शनात गरीब व गरजु व्यक्तीला रक्ताची तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने जिल्ह्यात व राजात रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख मा. शेरखान पठान यांच्या उपस्थितीत माढेळी बाजार या गावात प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होऊन अमन ब्लड बँक नागपुर यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये प्रहार चे तालुका अध्यक्ष अमोल काटकर,राहुल वाघ, भोला बहादे,रुगनमित्र होमेश वरभे.माढेळी गावातील सरपंच देवानंद महाजन, उपसरपंच सौ. वनिता ताई हुलके ,राजू डाफ ,देवरावजी देवतळे,महेश देवतळे, अनुप डाफ,आशिष खडसे,ईश्वर तोंडासे,रहीम शेख,सागर चट्टे, बालू ढेगरे,हर्षल मुळे या सर्व कार्य करतानी छ. शिवाजी महाराजांचे प्रतीमेच पुजन करण्यात येऊन रक्तदान करायला चालु केले व शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.