प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी गठीत व युवकांचा पक्ष प्रवेश

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 ऑगस्ट) :- प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मान.श्री. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्याची जिल्हाप्रमुख श्री शेरखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आज वरोरा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह येथे नवनिर्वाचित युवकांची समिती गठीत करण्यात आली .

यासोबत अनेक युवकांनी आपली यथाशक्ती दर्शवून पक्षप्रवेश घेतला तर यात चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून श्री जगदीश लांडगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ दुपट्टा नियुक्त पत्र देऊन त्यांना नियुक्त करून सन्मानित केले यासोबत श्री बालाजी खीरटकर यांची उपतालुका भद्रावती म्हणून निवड करण्यात आली.श्री निलेश हनुमान सोनकर यांची वरोरा उप तालुका म्हणून निवड करण्यात आली.पंडित बापूराव जुमनाके वरोरा तालुका आदिवासी संघटक म्हणून निवड करण्यात आली. कु .ओमकार कांबळे प्रहार विद्यार्थी संघटना तालुका प्रमुख वरोरा यांची निवड करण्यात आली तर आकाश बंडू येरेकार, स्वप्नील घनशाम वावरे,केतन पारखी , बालाजी खिराटकर, अमोल भाऊ काटकर, प्रतीक वानखेडे , केतन पारखी , इत्यादी युवकांनी पक्ष प्रवेश घेतला यांना पुष्गुच्छ नियुक्ती पत्र , दुपट्टा, देऊन सत्कार सन्मानित करण्यात आले.

व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या व पक्षाची धुरा बळकट करून पक्षाला सर्वतोपरी समोर नेऊन येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक शेत्रात ग्रामपंचायत , तालुका , जिल्हा व अन्य क्षेत्रात प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता हा निच्छितच राहील व नेता देखील राहील जेणेकरून गोर गरीब जनतेच्या समस्या तात्काळ निकाली लागेल व सर्वांना तात्काळ न्याय मिळेल या करिता आज पासून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन पुढील कार्य करावे असे मत यावेळी जिल्हा प्रमुख श्री शेरखान पठाण व उपाध्यक्ष श्री जगदीश भाऊ लांडगे यांनी मत व्यक्त केले सर्वांचे आभार प्रदर्शन मनोज गाठले यांनी केले.