पोहा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 जानेवारी) :- श्री.गुरुदेव सेवा मंडळ पोहा द्वारा आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या ५६वा पुण्यस्मरण सोहळा च्या औचित्याने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा गट अ वर्ग ८ते १० आणि गट ब वर्ग ४ते ७ या दोन गटात स्पर्धा २० जानेवारी २०२५ला आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत अ गटातून प्रथम पुरस्कार प्रवीण नरेंद्र रोडे द्वितीय पुरस्कार शंतनु पुरुषोत्तम खंगार तर तृतीय पुरस्कार संघर्ष दिलीप पेटकर याने मिळविला.

ब गटात प्रथम पुरस्कार कुमारी रीया विकास काकडे तर द्वितीय पुरस्कार संस्कृती मारोती उरकांडे तर तृतीय पुरस्कार परी श्याम खंगार हिने प्राप्त केला.या स्पर्धेचे परीक्षक श्री.वशिष्ठ रामभाऊ पेटकर सर यांनी जबाबदारी पार पाडली तर सर्व गुरुदेव भक्त श्री.अरविंद झाडे, गुणवंत उरकांडे ,पुरुषोत्तम खंगार, प्रदीप पाल,सुरेश पोतराजेआणि गावकरी मंडळी नी मदत केली.पुरस्कार वितरण गुरुदेव प्रचारक रविदादा मानव मोझरी यांच्या हस्ते करण्यात. आला.