पोहण्याचा बेत जीवावर बेतला The swimming line is about life

▫️स्वातंत्र्यदिनी युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू(Youth drowned on Independence Day)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 ऑगस्ट) :- कोरपणा तालुक्यातील माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी निसर्ग सौंदर्याने नटलेला अमलनाला प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर यवतमाळ जिल्हा आंध्र प्रदेशाच्या सीमावरती भागातील अनेक नवयुवक नवविवाहित जोडपे व व हाऊसे गवसे येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घाई गर्दी करतात .

या प्रकल्पाचे पाणी क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने येथील अतिरिक्त पाणी हे एका निसर्गनिर्मित नाल्याच्या वाटे बाहेर सोडले जाते ज्याला स्थानिक नागरिक वेस्ट वेअर असे म्हणतात याच ठिकाणी चंद्रपूर येथील काही युवक दुपारच्या सुमारास फिरण्यासाठी आले असता पोहण्याची हाऊस न आवरल्याने पाण्यामध्ये उड्या घ्यायला लागले ज्यामध्ये शुभम शंकरराव चिंचोलकर वय 32 याने आता येत नसताना सुद्धा खोल पाण्यात उडी मारली त्यातच त्याचा मृत्यू झाला .

मात्र स्वातंत्र्यदिनी त्याच्यावरती मृत्यूची शोक कडा पसरली यामुळे परिसरात हडळ व्यक्त केल्या जात आहे घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळतात ठाणेदार रवींद्र शिंदे हे आपल्या ताभ्यासहित दाखल झाले व त्यांनी शुभमचे मृत शेव बाहेर काढले यापूर्वीही पावसाळ्याच्या दिवसात अशा अनेक घटना याच परिसरात घडलेल्या असताना सुद्धा नवयुवक वर्ग यापासून धडा का शिकत नाही हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे त्याला कारणही तसेच आहे.

येथील निसर्ग सौंदर्य हे माणसाच्या मनाला भुरळ पाडणारे आहे मात्र शेवटी जीव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे या गोष्टीचा धडा इथे येणाऱ्या पर्यटकांनी घ्यावा असे आव्हान गटचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांनी केले असून यापुढे या ठिकाणी चौक बंदोबस्त ठेवल्या जाईल असे त्यांनी सांगितले.

मागील पावसाळ्यात येथे अनेकांचे जीव गेले अनेकांचे परिवार उघड्यावर पडले मात्र आम्हाला व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने बेस्ट वेअर परिसरात सौंदर्यकरणाचे काम केल्याचे दिसून येते यावरून असे दिसून येते की येथील प्रशासनाला लोकांच्या जीविताचे बिलकुल भान नाही सदरच्या परिसरात नागरिकास ये जा करण्याकरिता कायमची बंदी घालावी अशी मागणी आता परिसरातील गावाची यांनी केली आहे.