पोलीस स्टेशन शेगाव बू येथे जागतिक महिला दिन साजरा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.13 मार्च) :- आज दि .१३/०३/२०२४ रोज बुधवार ला पोलीस पाटील यांची मासिक मिटिंग घेण्यात आली. यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस पाटील मधून उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिला पोलीस पाटील यांना सन्मानचिन्ह चिन्ह व प्रशस्थीपत्र देऊन गौरविण्यात आले त्यात सौ मयुरी सतीश वर्भे गाव मेसा आणि सौ प्रतिभा चंद्रकांत पिंपळकर यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार मा. ठाणेदार श्री शैलेंद्र ठाकरे साहेब यांनी केला. तसेच पडोळे साहेब यांचा पदोन्नती बद्दल सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

     या कार्यक्रम प्रसंगी पोलीस पाटील आनंद भाऊ थुटे,थुल, सोयाम, गणवीर, हनवते, येरमे, सांगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दिपक निब्रड यांनी जागतिक महिला दिनाची सुरवात व महिलावरील अन्यायला वाचा फोडली. तर कार्यक्रमचे अध्यक्ष ठाणेदार ठाकरे साहेब यांनी जुन्या रूढी प्रथा परंपरा व आजची स्त्री यात होत गेलेल्या बदलाचे महत्व सांगून शिक्षणाचे फायदे समजावून सांगितले.

  पोलीस स्टेशन शेगाव बू येथील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवत मा. ठाणेदार ठाकरे साहेब यांनी हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थोडा उशिरा घेतला कारण ८ मार्च हा जागतिक महिला दिन होता परंतु त्या दिवशी महाशिवरात्री ची ३ दिवस भटाळा येथे जत्रा होती आणि त्या जत्रेला लाखो भाविक येत असतात.

त्यात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त करून स्वतः तिथे राहून जत्रा शांततेत पार पाडण्यात त्यांना मोठे यश आले आणि आज जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला.त्यातच त्यांनी येणाऱ्या निवडणूक विषयी, होळीविषयी सूचना दिल्या व सर्व पोलीस पाटील यांचे आभार मानले.