पोलीस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकाद्वारे पोस्टे परीसरात होणा-या बॅटरी चोरी व 02 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आरोपीकडुन 21 बॅट-या जप्त

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 जुलै) :- पोलीस स्टेशन पडोली येथे दिनांक 20/05/2024 रोजी फिर्यादी विकास प्रभाकर जोगी वय 39 वर्ष धंदा-खाजगी नौकरी जात- कुणबी रा. वृंदावन नगर तुकुम चंद्रपुर यांनी पोस्टेला येवुन तक्रार दिली की त्यांचे टाटा शोरुममध्ये सर्विसिंग व दुरुस्तीकरीता शोरुमचे यार्डमध्ये ठेवुन असलेली हायया ट्रक क्र. एमएच 34 बीजी 5466 ला लागुन असलेल्या एस एफ सोनिक कंपनीच्या दोन बॅट-या कि. 14,000/- रु. किंमतीच्या दि. 15/07/2024 चे 19/30 वा ते दि. 18/07/2024 चे 10/00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरुन नेले अस्या फिर्यादवरुन पोस्टेला पोस्टे अप क्र. 129/2024 कलम 303 (2) बी.एन.एस प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

मा. पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम चंद्रपुर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर सा. यांनी गुन्हे शोध पथक पडोली यांना पोस्टे परीसरात होत असलेल्या वॅट-या चोरीबाबत तसेच बॅटरी चोरीच्या दाखल गुन्हयाची गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्यावरुनस डीबी इंचार्ज स. फौ. कैलास खोब्रागडे सोबत पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोअं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे, पोअं किशोर वाकाटे यांना आरोपी शोधकामी मार्गदर्शन करुन गुन्हेगार सोध कामी रवाणा केले.

व अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना दि. 20/07/2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतगाराकडुन खात्रीशीर खबर मिळाली की पडोली येथील महाराजा बेकरी मध्ये काम करणारा ड्रायव्हर हा त्याचे ताब्यात असलेल्या एका सफेद रंगाचे टाटा कंपनीची इंडिका क़ार मध्ये बैट-या भरुन विक्री करीता चंद्रपुर कडे जात असल्याची खबर प्राप्त झाल्याने सदर कारचा शोध घेत चंद्रपुर कडे गेलो असता सदर संशयीत कार ही दुर्गापुर रोड कडील तुकुम येथे दिसुन आली असता.

सदर कारचालक यास थांबविण्याबाबात ईशारा केला असता त्याने आपली कार रोडचे बाजुला थांबविली त्यास कारचे खाली उतरण्यास सांगुन त्या ईसमास आम्हा पोलिसांचा सविस्तर परीचय देवुन त्याचे पुर्ण नाव पत्ता विचारले असता त्याने अब्रार अहमद खाँन वय 27 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. फेमस बेकरी 1600 प्लॉट नेहरु नगर अकोला ह.मु. ईम्तियाज अहमद खॉन यांची महाराजा बेकरी खुटाळा ता. जि. चंद्रपुर असे संगितले सदर ईसमाचे ताब्यातील असलेली टाटा कंपनीची इंडीका कार क्र. एम एच 34 के 5418 ची तपासनी केली असता सदर कारचे मागील सिटवर व मागील डिक्कीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लहान मोठ्या 21 बॅट-या मिळुन आल्या त्याबाबत विचारपुस केली असता सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला नंतर विश्वासात घेवुन विचारपुस केल्याने त्याने कबुल करुन पोस्टे परीसरात उभ्या असलेल्या ट्रक हायवा पिकअप मधिल बॅट-या चोरी केल्याचे कबुल केले वरुन आरोपीस पोस्टे पडोली अप क्र. 129/2024 कलम 303 (2) बीएनएस या गुन्ह्यात अटक करुन आरोपीचे ताब्यात मिळुन आलेल्या 21 नग बेंट-या लहान मोठ्या कि. 1,20,000/- रु. गुन्हा करतेवेळी वापरात आणलेली टाटा कंपनीची इंडिका कार क्र. एमएच 34 के 5418 कि. 2,00,000/- असा एकुन 3,20,000/- रु. चा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपीने पोस्टे अप क्र. 119/2024 मधील मोटारसायकल कि. 20,000/-रु. व 120/2024 कलम 379 भादवि मधील मोटारसायकल किं. 50,000/- रु. गुन्हयातील चोरी गेलेल्या मोटारसायकल चोरीबाबत कबुली दिलेली असुन आरोपीस प्रोड्युस वारंट प्राप्त करुन चोरीस गेलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात येते.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम चंद्रपुर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकरं सा. यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषन विभागाचे इंचार्ज स.फौ. कैलास खोब्रागडे, पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोअं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे, पोअं किशोर वाकाटे यांनी पार पाडली.