पोथरा व लाल नाला कालव्याची दुरुस्ती करुन रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि 26 सप्टेंबर) :- पोथरा व लाल नाला प्रकल्पच्या कालव्याच्या पाळी यावर्षी पावसाळ्यात खचल्यामुळे पाणी रस्त्यावर येत होते त्यामुळे कालव्या लगत असलेल्या शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी चिखलाचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे कालव्याच्या पाळीची दुरुस्ती लवकरात लवकर करुन रब्बी हंगामा साठी शेतीला पाण्याची आवश्यकता पडते तेव्हा दोन्ही कालव्यातुन दिनांक १० आॅक्टोंबर पर्यंत पाणी सोडण्यात यावे असे निवेदन डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात मा.उपविभागीय अभियंता,ल.पो.ला पाट बंधारे उपविभाग,वरोरा यांना निवेदन देतांना प्रविण वासेकर,चंद्रशेखर झाडे,लहु ठक, संदीप वासेकर, दिलीप जेऊरकर, गजानन बोडे पुष्पाकर खेवले, गुणवंत जेऊरकर, महेश वराटकर जामणी व आटमुर्डी येथिल शेतकरी बांधव उपस्थित होते.