पूनम शर्मा द्वितीय पारितोषिकने सन्मानित

🔹एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींचा स्पर्धेत सहभाग

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.3 ऑगस्ट) :- अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गॉर्डन विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे तीन दिवसीय जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल (एसएनडीटी महिला विद्यापीठाचे बल्लारपूर केंद्र ) बल्लारपूरच्या विद्यार्थीनी उत्साहाने सहभागी झाल्या.

यामध्ये बीसीए ची विद्यार्थीनी पुनम शर्मा आर्ट स्पर्धेत सहभागी झाली आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यासोबतच इंटिरियर डिजाईन ची विद्यार्थीनी कोमल आगलावे आणि स्लोगन स्पर्धेत फूड प्रोसेलिंग अँन्ड टेक्नालॉजी ची विद्यार्थीनी कशिश अलोने या सहभागी झाल्या होत्या यांनाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमाणपत्र व बक्षीस चे वितरण चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू तसेच , उपसंचालक आनंद रेड्डी, उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोंग यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहाय्यक कुलसचिव डॉ बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी स्पर्धकांचे व विजेत्यांचे विशेष कौतुक केले आणि सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अश्विनी वाणी यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले तसेच प्रा. खुशूबू जोसेफ आणी प्रा. श्रुतिका राऊत यांनी विशेष सहकार्य केले.