पुसेगांव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.26 ऑगस्ट) :- सेंट्रींग लोखंडी प्लेटासह बोलोरो पिकअप ताब्यांत, साडे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांची कामगिरी, पुसेगांव पोलीस ठाण्याचे दोनच दिवसांपूर्वी नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्यासमोर पुसेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मौजे खातगुण (ता. खटाव) गावच्या हद्दीतील वेदांतवती हायस्कूल शाळेच्या जवळील वास्तव्यास असणाऱ्या अमोल दिलीप जाधव यांच्या नव्या घराचे काम सुरू होते, सदर बांधकाम ठिकाणी ठेकेदार हनुमंत आसंगी यांनी स्लॅबसाठी लागणाऱ्या 95 लोखंडी प्लेटा आणून ठेवल्या होत्या दि.२४/०८/२०२४रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पुसेगांव पोलीस ठाण्यात दिली होती.

सदर चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या 95 लोखंडी प्लेटा चोरणारे आरोपी निष्पन्न करून गुन्ह्यांमध्ये अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करणे हे पुसेगांव पोलीसासमोर मोठे आव्हान होते, सदर चोरीची गंभीर दाखल घेत नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपल्या पोलिस ठाण्यातील सहकाऱ्यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत गोपनीय बातमीदारांच्या माहितीद्वारे अवघ्या दोन तासांत पुसेगांव पोलीसांनी अगदी शिताफीने आरोपी पर्यंत पोहोचले, आणि चोरीस गेलेला मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमनाथ उर्फ बबल्या लावंड ( वय 32) रा.खातगुण ता. खटाव जि. सातारा) असे आरोपींचे नाव आहे, सदर आरोपींच्या कब्जांतून चोरीस गेलेला मुद्देमाल यामध्ये जवळपास साडे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पुसेगांव पोलीस ठाण्याच्या कामगिरीबद्दल जनतेतून विशेष कौतुक होत आहे, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण पो.उपनि सुधाकर भोसले पो. हवा. तात्या ढोले, दौलत कुदळे योगेश बागल पोलीस नाईक सुनील अबदागिरे अशोक सरक तुषार बाबर पो.कॉ. शंकर सुतार ज्ञानेश्वर जाधव आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला सदर कारवाई पथकांतील अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव यांनी अभिनंदन केले.