✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)
महागाव (दि.23 एप्रिल) :-
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पुसद तालुक्यांना वादळी वाऱ्याने झोडपले गारपिटासह मुसळधार पाऊस वातावरणातील बदल व निसर्गाच्या लहरीपणाच्या धरणापुढे शेतकरी हतबल व हताश झाला असून काल रात्री सायंकाळी अवेळी झालेल्या जोरदार हव्यासह झालेल्या मुसळधार पावसाने महागाव व पुसद तालुक्यात निसर्गाने रुद्र रूप धारण केल्याने ग्रामीण विभागात हाहाकार उडाला होता .
या गारपीट व मुसळधार पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले ज्यामध्ये बाजरी ज्वारी टरबूज फळबाग आंबा या पिकाचे प्रचंड नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झालं घरावरील पत्रे छप्पर उडाली व घराची पडझड झाली विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा पूर्णता खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .
या नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेतमालाचे व घराच्या पडझडीचे तातडीने पंचनामे आटोपून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही यांची जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी व त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे