✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.24 डिसेंबर) :- तालुक्यातील बोर्डा येथील पोहाणे लेआउट मधील पुनम मधुकर लांबट यांनी नुकतीच आचार्य पदवी प्राप्त केली आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथे आयोजित ११२ व्या दीक्षांत समारंभात पुनम लांबट यांना गणित विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. “सम इन इन्वेस्टीगेशन अलटलोटिव्ह थेरीज ऑफ ग्रविटेशन” हा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे गणित विषयाचे प्राध्यापक डॉ. अशोक पुंड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. सध्या त्या नागपूर येथील तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे गणित विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पुनम लांबट यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. अशोक पुंड, डॉ. सुभाष ताडे, वडील मधुकर लांबट, आई आशा लांबट तसेच कुटुंबीय आणि मित्र परिवाराला दिले आहे.