पुणे भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी 

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.4 जुलै) :- 

दिनांक ३० जून रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी व अंमलदार मां वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार नितेश चोरमोले अभिनय चौधरी अवधूत जमदाडे यांना अशी बातमी मिळाली की सातारा रोडवरील लोखंडी पुलाच्या अलीकडे एक इसम बॉडी बिल्डिंग साठी लागणारे अवैध इंजेक्शन ग्राहकांना विक्री करीत आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सातारा रोडवरील लोखंडी पुलाचे खालील बाजू जाऊन पाहता तेथे बातमी प्रमाणे इसम आझाद मुमताज खान वय वर्ष ४१ व्यापार जिम व्यवसाय राहणारे फ्लॅट नंबर सी प्रेम हाईट स न ३३/३ बी आंबेगाव बुद्रुक पुणे तिच्याकडे 13 नग इंजेक्शन्स बॉडी बिल्डिंग साठी लागणारे अवैध इंजेक्शन्स व पाच सिरीज सह मिळून आल्याने त्यांच्याकडून नमूद माल जप्त करून त्यांचे विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार मां पोलीस आयुक्त पुणे शहर मां प्रवीण पवार सहआयुक्त 

प्रवीण कुमार अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती स्मरताना पाटील पोलीस उपयुक्त परीमंडळ पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी अवधूत जमदाडे सचिन सरपाले शैलेश साठे नामदेव रेणूचे चेतन गोरे यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यामुळे सर्व स्तरांमधून पुणे पोलिसांचं कौतुक होत आहे.