पिक विमा फक्त एक रुपयात Pick insurance for just one rupee

????जिल्हा कृषि अधिक्षक शंकर तोटावार यांची सिएससी केन्द्राला भेट (District Agriculture Superintendent Shankar Totawar visited CSC Centre)

????सर्वांनी पिक विमा काढण्याचे कृषि विभागाचे आवाहन(Agriculture department appeals to everyone to take out crop insurance)

✒️मनोहर खिरटकर खाबांडा(Khambada प्रतिनिधि)

खांबडा (दि.10 जुलै) :- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे आयोजित पिक विमा कॅम्प ला भेट देऊन सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले. ९जुलै २०२३खाबांडा येथे सिएससी केन्द्राला भेट देताना केले 

        दरवर्षी पिकविमा काढायला विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम भरून विमा काढला जात होता परंतु यावर्षी शासनाने केवळ एक रुपयात विमा काढायची सोय उपलब्ध करून दिल्याने सर्व शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवू लागले आहेत. विमा उतरविण्याकरिता तालुका कृषि अधिकारी वरोरा मार्फत मौजा खांबाडा येथे नामदेव थाटे यांचे सीएससी सेतू केंद्रावर आयोजित पिक विमा कॅम्प ला भेट देऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व पिकविमा काढण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

     तसेच शंकरराव तोटावर यांनी तालुक्यातील विविध पिक प्रात्यक्षिके अंतर्गत सोयाबिन व कापूस पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले व मौजा चिनोरा येथील कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी चे स्मार्ट अंतर्गत काम सुरू असलेल्या जिनिंग प्रेसिंग प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

    तालुका कृषि अधिकारी सुशांत लव्हटे यांचे मार्गदर्शनात आयोजित पिक विमा कॅम्प व संपूर्ण दौरा प्रसंगी सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक दिपक चौरे . तथा खाबाडा परिसरातील शेतकरी उपस्थित होते