पिक विमा कंपनी करतो शेतकऱ्यांची दिशाभूल प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23 फेब्रुवारी) :- १०व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात चिमूर तालुक्यात व चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस झाल्याने हरभरा , ज्वारी, गहू, मुंग तथा मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दहा ते बारा दिवसांपूर्वी चिमूर १० व११ ताखेला पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या रब्बी पिके हे ९०%उध्दवस्त झाले.झालेल्या नुकसानाचे विमा धारक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी ७२ तासाचा आत तक्रार करायची होती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार सुध्दा केली.

पिक विमा कंपनी कडून दहा दिवसा नंतर नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी दहा दिवसांनी पाहणी करण्यासाठी येणार असे तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यांना सांगीतले पण शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्याले दहा दिवस अधिक होऊन झाले तरी पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले नाही.

अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.मात्र पिक विमा कंपनी कडून यांची दखल अद्याप घेण्यात आली नाही.विक विमा कंपनी ने त्वरित नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी किंव्हा सरसकट नुकसान जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावे.अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.