पावसाळ्याच्या दिवसातही पाण्यासाठी नागरिकांची भटकंती Citizens wander for water even on rainy days

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव (दि.1 ऑगस्ट) :- येथून जवळच असलेल्या व वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर व ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोअर लगत येत असलेल्या तुकूम या गावात पावसाळ्यातही प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे पाण्यासाठी गावातील शेतमजूर, शेतकऱ्यांना, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे..

तुकूम हे गाव बारा घरांचे असून वरोरा तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या ठिकाणी मागील चार महिन्यापासून प्रशासक असल्यामुळे प्रशासनाने तुकुम या 12 घरांच्या वस्तीकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्यामुळे ऐण शेतीच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे हातपंप काही दिवसापासून बंद असून याची माहिती वारंवार नागरिकांनी प्रशाक्षणाला देऊन सुद्धा महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून याकडे सबंधित विभाग,लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.