🔸वरोरा तालुक्यातील शेतकरी पाहताहेत चातकाप्रमाणे पावसाची वाट(Farmers of warora taluka are waiting for rain like Chatka)
✒️मनोहर खिरटकर(खाबांडा प्रतिनिधि)
खांबाडा (दि.21 जून) :- वरोरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जून निम्मा संपला, तरी तालुक्यात एकही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात उन्हाचा कहर सुरू असून, घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.
दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत असून, सायंकाळी सुटणा-या वाऱ्याने पावसाची दिशा बदलली आहे. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मे महिन्यातही अवकाळीने नदिनाले भरून वाहती झाली. पण जूनमध्ये वेळेत पाऊस पडेल, अशी आशा असलेल्या शेतकयांच्या डोळ्यांत पाऊस लांबल्याने पाणी आले आहे.
तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस झाला नसल्याने कापुस, सोयाबीन, ज्वारी ,भात आदींच्या पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात खाबांडा येथील संत श्री मुधाजी महाराज वर्ष शताब्दी सोहळा कोरडाच जाणार असे खाबाडा येथील शेतकरी सांगतात पाऊस नसल्याने अनेकांची वारीही यंदा चुकली. अनेक शेतकरी पाऊस झाल्यानंतर पेरण्या करून वारीला जातात. मात्र, पावसाचा पत्ता नाही.
खाबांडा गावासाठी वरदान ठरलेल्या पोथरा नदीत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, शेतकऱ्यांची भिस्त आता पावसावर आहे कित्येक शेतकर्यानी कोरड्यावरच कापुस लागवड केली असल्याने त्त्यांच्यासमोर खुपमोठे संकट उभे आहे.
प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतीसह, जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकन्यांना आहे. दरवर्षी वेळेवर दाखल होणारा पाऊस लांबल्याने शेतकन्यांची चिंता वाढली आहे. पाऊस झाला नाही तर पेरण्या कशा करणार, असा प्रश्नः शेतकर्याना पडला त्यामुडे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे