पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य प्रमाणे विकसित होऊ द्यावे : इंद्रजीत देशमुख

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.14 जून) :- 

गुणवंत विद्यार्थी संधी मिळाल्यास विविध क्षेत्रात यश संपादित करू शकतो : आमदार समाधान आवताडे कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून कै. महादेवराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवारी पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस येथे करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध व्याख्याते व माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख म्हणाले की 

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी आपला कल ओळखून आपले करिअर घडवावे पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य प्रमाणे विकसित होऊ द्यावे असे मार्गदर्शन आपल्या अध्यक्ष भाषणातून इंद्रजीत देशमुख यांनी केले. 

यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या ग्रामीण भागात देखील अनेक विद्यार्थी गुणवान आहेत. त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे आपली कर्तव्य आहे. यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

पंढरपूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्याख्याते व माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे होते तर बक्षीस वितरण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले 

या कार्यक्रमात दहावी आणि बारावी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके गटविकास अधिकारी सुशील संसारे व गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.