पारोधी नदीतून सर्रास भर दिवसा रेती ची चोरी  Stealing of sand from the Parodhi river is rampant during the day

🔸समंधीत विभागचे डोळे बंद का ?(Why close the eyes of the Samandhi department?)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर (दि.3 जुलै) :- शेगाव बू येथून जवळच असलेल्या व भद्रावती तालुक्यात येत असलेल्या पारोधी गाव लगत असलेल्या नदीतून सर्रास पने दिवसा ढवळ्या रेतीची चोरी होत असून या गंभीर समस्या कडे संबधित विभागचे तसेच महसूल विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष का? असा सवाल येथील नागरिक करू लागले आहे.. 

         सविस्तर असे की या नदीचा रेती उपसा करण्याचा रेती घाट लिलाव झालेला नाही तरी देखील बोरगाव , चंदनखेडा , शेगाव येथील रेती तस्कर भर दिवसा ढवळ्या रेतीची चोरी करीत असून ज्यादा पैसे कमावण्याच्या नादात लागले आहे . शिवाय रेतीने भरलेले ट्रॅक्टर गावातून तसेच बाहेरून चंदनखेडा शेगाव खुर्द शेगाव या मुख्य मार्गावरून सैरा वैरा धावत असतात . शिवाय हा मार्ग अरुंद असल्याने कुणाचीही पर्वा न करता सोसाट्याने धावत असतात . या ट्रॅक्टर चालकांना अपघाताची भीती नसून संबधित विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती ची चोरी करणे हाच मुख्य हेतू असतो . 

           या नदी रेती घाटावर रेती चोरट्यांची करडी नजर असून करोडो रुपयांची रेती आज पर्यंत चोरीला गेलेली असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे. महसूल विभागाला करोडो रुपयाचा चुना लागत असून देखील महसूल विभागच्या डोळ्यावर पट्टी का? या रेती चोरट्यावर का कारवाई होत नाही यांचे ट्रॅक्टर जप्त का करीत नाही ? अश्या अनेक सवालात पारोधी वासिय अडकलेले आहेत . तेव्हा स्थानिक संबधित विभागाच्या कर्मचारी तसेच महसूल अधिकारी यांच्यावर असलेला विश्वास पारोधी वासियांना उडालेला आहे करिता मा.श्री जिल्हाधिकारी साहेब यांनी याकडे लक्ष केंद्रित करून रेती चोरीवर आळा घालून चोरट्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.   

            पारोधी वासियांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये या करिता या नदीत विहीर असून याच विहरीतून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा केला जातो . रेती मुळे पाणी साठा भरपूर असतो शिवाय रेतीमुळे गडूळ पाणी शुद्ध होते . परंतु हे रेती चोरटे चक्क विहारी लगत परिसरातील सर्रास रेतीचा उपसा करीत आहे .तेव्हा भविष्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या नाकारता येत नाही . तेव्हा या नदीतून होणाऱ्या रेती चोरीवर कायमचा आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे…..