पहाटे चार वाजताच्या सुमारास गावांत वाघ अन् नागरिकात उडाला थरकाप

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 फेब्रुवारी) :-  इथून जवळ असलेल्या रामदेगी (निमढेला) गेट हा बेंबळा गावाच्या जवळ असून आज पहाटे चार वाजताच्याच सुमारास अचानक दोन वाघ गावांत दिसताच गावांतील नागरीकांत थरकापच उडाला.

       वरोरा तालुक्यांत जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प अनेक गावांना लागून आहे. या ताडोबाच्या जंगलात वन्यप्राणी मनमोकळेपणाने वावर करीत असतात. वाघ दिसला की अनेकांची भंबेरी उडून जाते. रामदेगी (निमढेला) परीसरात सध्या छोटा मटका, भानुसखिंडी व तिच्या बछड्याचा वावर असून, पर्यटकाना अनेकदा पाहायला मिळत असून त्यांचे आकर्षण सद्या या परीसरात पहायला मिळत आहे. वन विभागातील एका सफाई कामगाराला याच भानुसखिंडीच्या बछड्याने जागेवरच ठार केले असल्याची आता या आठ दिवसांची ताजी घटना घडली होती.

हि ताजी घटना असून आज पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास याच भानुसखिंडीचे दोन बछडे बेंबाळ गावांतील एका घरा शेजारीच रोडवर बसून असल्याचे एका शेतकरी युवकाला दिसून आला. वाघ पाहताच गावांतील नागरीकांना याची माहिती दिली वाघ पाहताच नागरिकाना थरकापच सुटला होता. या घटनेची माहिती वन विभागातील बफर झोन मधील वन परिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी तात्काळ बेंबाळ गावांत वन पथक पाठवुन फटाके फोडून त्या वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. मात्र वाघ जंगलात गेलेला नसून गावातील तलावामधील बेशरमचे झाडे असणाऱ्या झुडपात लपून बसला असल्याचे गावातील नागरिकांनी दैनिक पुण्यनगरीच्या प्रतिनिधी जवळ सांगितले.

       सध्या शेतातील रब्बी पिकांच्या हंगाम असून शेतात गहू, चना, यासह भाजीपाला व इतर पिक शेतात लावलेली आहेत. या पिकांची रखवली करायला जागली जावे लागते तसेच गहू पिक कापणीवर आलेले असून शेतात मजूर काम करीत असतात. मात्र आज चक्कभानुसखिंडीच्या दोन बछड्यानी गावातच एंट्री केल्याने गावांतील नागरीक भयभीत झालेले आहेत. त्यामुळं वन विभागानी नागरीकाना व जंगला शेजारील शेतकऱ्याना सुरक्षा पुरवाव्यात अशी मागणी बेंबाळ येथील गावकऱ्यानी केली आहे.

    मी सकाळी ४ वाजता उठून शेताकडे दुचाकीने जात होतो तर मला रस्त्यावरच वाघ बसून असल्याचे दिसून आले. यावेळी मी घरी जावून गावातील नागरिकाना वाघ बसून असल्याची माहिती दिली. तर गावातील नागरीक आरडाओरडा करीत आले. तर दोन वाघ दोन्ही साईडने अलग अलग गेले त्यातून एक वाघ गावातील तलावमधील बेशरमच्या झुडपात लपून बसला आहे. तो अजूनही बाहेर निघाला नाही…सूरज लोहटकर, युवा शेतकरी

   गावात वाघ आला असल्याची माहिती वन विभागातील अधिकारी यांना दिली. गावातील नागरीक जंगलात सरपन आणायला जात असतात त्यांच्या सुरक्षेकरीता म्हणुन वन विभाग यांनी बीट उपलब्ध करून द्यावे किंवा गॅस उपलब्ध करुन द्यावे… श्रीकांत दडमल, माजी सरपंच बेंबळा

      सदर घटना पहाटेला वाघ गावात आलेला असल्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झालोत व फटाके फोडून वाघाला जंगलात पळविले. आज सकाळी जंगलात गस्त केली असता भानुसखिंडीचे तीनही बछडे जंगलात पर्यटक व आम्हाला दिसून आलेत. त्यामुळं बेंबाळ गावातील नागरिकांनी भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वन विभागातील कर्मचारी गावकरी सोबत आहोत… मोहन हटवार, क्षेत्र सहाय्यक निमढेला