✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.3 मे ) : – राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षासोबतच राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. याचे पडसाद भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातही ऊमटले असुन याबाबत क्षेत्रात अनेक प्रतिक्रीयाही ऊमटु लागल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानीक कार्यकर्त्यांना पवार साहेबांचा निर्णय हा कार्यकर्त्यांना दुःख देणारा व कार्यकर्यांमधे नैराश्य निर्माण करणारा असल्याचे वाटते तर दुसरीकडे शरद पवारांचा हा निर्णय म्हणजे एखादी राजकीय खेळी तर नसावी अशी शंका राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. पवारांनी आपला हा निर्णय परत घेऊन अध्यक्षपदावर आजीवन कार्यरत रहावे असे येथील राष्ट्रवादिच्या पदाधिकाऱ्यांना व सामान्य कार्यकर्त्यांना वाटते.
राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी पवार साहेब जरी वयाने निवृत्तीवर असले तरी त्यांचे अन्यक्षपदावर राहणे हे युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे असुन त्यांच्या अनुभवाचा फायदा केवळ राष्ट्रवादिलाच नव्हे तर संपुर्ण राज्याला व देशाला आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व कार्यकर्त्यांच्या संवेदन लक्षात घेऊन पवारसाहेबांनी आपला राजिनाम्याचा निर्णय मागे घेऊन अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली आहे.
तर राष्ट्रवादिचे भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी पवार साहेबांचा अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांसाठी शोकदायी असल्याचे मत व्यक्त केले. पक्षाला आणी राज्याला पवारसाहेबांच्या नेतृत्वाची अजुनही गरज असल्याचे मत व्यक्त करीत पवारसाहेबांनी आजिवन अध्यक्षपदावर कायम रहावे असे म्हटले आहे. शरद पवारांनी आपला अध्यक्षपदाचा राजिनामा मागे घ्यावा असाच सुर येथील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमधे दिसुन येत आहे.
या सर्व कार्यकर्त्यांची विनंती पवार साहेब मान्य करतील काय, ते राजिनामा परत घेऊन अध्यक्षपदावर पुर्ववत होतील काय हे येणारा काळच सांगेल. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी तथा युवा नेते मुनाज शेख, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर, विलास नेरकर, माजी युवक राष्ट्रवादी जिल्हा चंद्रपुरचे अध्यक्ष फय्याज शेख, सुनील महाले, प्रा. राजेंद्र ताजने, रोशन कोमरेड्डीवार,अमोल बडगे, अजय कावळे,प्रमोद वावरे,राकेश किनेकर, ओमकार पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : मनोज गाठले
संपर्क : 9767883091