परोधी नदी घाटावरून रेती तस्करी करणाऱ्या वर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून बुडीत महसूल वसूल करा…. गावकऱ्यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.4 डिसेंबर) :- येथून जवळच असलेल्या पारोधी नदी घाटाचा लिलाव झाला नसून या नदी घाटावरून काही रेती तस्कर गेल्या अनेक दिवसापासून शासनाच्या डोळ्यात धुळधोकून तसेच महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून अनेक दिवसापासून रेतीची तस्करी करून गोर गरिबाची लुबाडणूक करून त्यांच्याकडून मनसोक्त रेती विक्री करीत होते.

      काल दिनांक 3 तारीख च्या मध्यरात्री गावकऱ्यांच्या सहकार्याने पारोधि नदी घाटावरून अव्यध्या रित्या रेती तस्करी करीत असताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले . व याची माहिती भद्रावती येथील तहसीलदार महोदय यांना दिली परंतु त्यांनी फोन न उचलून गावकऱ्यांचा अपमान केला तसेच याचीच माहिती स्थानिक शेगाव हद्दीत येत असलेल्या पोलीस स्टेशन येथील ठानेदार यांना याची माहिती दिली तेव्हा त्यांचे काही सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन शेगाव येथे दाखल केले व त्यांच्या ड्रायव्हरवर कारवाई केली.

मागील कित्येक महिन्यांपासून पारोधी परिसरातील सर्व रेती घाटातील सुमारे 5000 ब्रासच्या वरती रेती चोरी करून नदी पात्रात मोठ मोठे खड्डे तयार केले.त्याची सुद्धा वरिष्ठ अधिकऱ्यांकडून चौकशी करून झालेल्या शासनाच्या महसुलाची नुकसान केलेली आहे. त्यांचे सुद्धा मोजमाप करून झालेल्या नुकसानीची संबंधित ट्रॅक्टर मालक सुधीर मुडेवार, सुमित मुडेवार व सुभाष जांभुळे यांच्याकडून वसूल करण्यात यावी. जेणेकरून परत रेती चोरीची हिंमत करणार नाही जोपर्यंत वाळू माफीयाच्या मुसक्या आवरणार नाही तोपर्यंत रेती माफीया यांना आळा बसणार नाही.

करिता पारोधी येथील ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील मारोती बदकी यांच्यासह निवेदनातून गावकऱ्यांनी मागणी केली आहे तसेच मा. श्री जिल्हाधिकारी साहेब , जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर. मा. श्री पोलीस अधीक्षक पोलीस मुख्यालय चंद्रपूर. मा.उपविभागीय अधिकारी , उपविभागीय कार्यालय वरोरा. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय भद्रावती. मा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शेगाव बु यांना निवेदनातून कळवून आपली मागणी केली आहे.