🔹शेत पिकाची पाहणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…राजूभाऊ चिकटे यांची मागणी
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.14 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव चारगाव परिसरात गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली या परतीच्या पावसाने शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक हे धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांची शेती पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मुस्कान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री राजूभाऊ चिकटे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा तथा ग्रामपंचायत चारगाव चे सरपंच यांनी केली आहे ..
सविस्तर असे की गेल्या दोन दिवसांमध्ये वरोरा तालुक्यामधील चारगाव बु. शेगाव बूज, साखरा. व अन्य गावामध्ये परतीच्या पावसाने मेघ गर्जनासह हजेरी लावली असल्याने सध्या शेतामध्ये सोयाबीन हे पीक उभे असून काही शेतकऱ्यांची कापणी झाली तर काहींचे पीक उभे आहे तर काही शेतकऱ्यांची पीक ढीग लागले आहे .परंतु या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हाती आलेले पीक कायमचे नष्ट होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच शेतकऱ्यांनी पीक मशागतीसाठी तसेच बी बियाणे खरेदीसाठी कर्जबाजारी होऊन आपली शेती फुलवली परंतु या अवकाळी पावसाने हाती आलेली पीक नष्ट होत असल्याने येथील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त यासोबत हवालदिल झाला आहे .
तेव्हा शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन शासनाने तात्काळ रित्या या भागाची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांसोबत युवा शेतकरी पुत्र श्री राजूभाऊ चिकटे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा तसेच ग्रामपंचायत चारगाव चे सरपंच यांनी केली आहे.