पनवेल येथे श्रावण सम्रागणी 2024 सोहळा उत्साहात संपन्न

✒️सारंग महाजन मुंबई(Mumbai प्रतिनिधी)

मुंबई(दि.27 सप्टेंबर) :- पनवेल येथील दिशा महिला मंच यांच्या विद्यमाने पनवेल येथील श्री पूज्य सिंधी पंचायत हॉल येथे रविवारी दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी चार वाजता रायगड श्रावणी सम्रागणी 2024 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे दिग्दर्शक पेन तालुक्यातील खारपाडा गावाचे सुपुत्र तथा मॉडेल ऍक्टर दिग्दर्शक देवदत्त धरत यांनी केले आहे या कार्यक्रमात देव एक्टिंग मॉडलिंग अकॅडमी नवी मुंबई व पनवेलच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे .

         देव एक्टिंग मॉडलिंग अकॅडमी नवी मुंबई पनवेलची विद्यार्थिनी मिस रायगड श्रावण सम्रागणी 2024 विनर झाली त्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहे स्पर्धेतील विजेत्यांना क्राऊन सॅश, 20 हजार रुपये बर्थ डे कुपन व सन्मान चिन्ह देण्यात आले. निवड झालेल्या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.